नाशिक: नदीत पोहण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोड परिसरातील वालदेवी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या 15 वर्षीय शाळकरी मुलाचा पाण्यात बुडवून मृत्यू झाला आहे.

अंकुश राजाराम बोराडे असे मृत मुलाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, पिंपळगाव खांब शिवारातील गणेश नगरमध्ये बोराडे कुटुंब वास्तव्यास आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: १२ केंद्रांवर ४,३८3 विद्यार्थ्यांची आज सीईटी परीक्षा

गावाजवळून वालदेवी नदी जाते.

या नदीत बोराडे यांचा मुलगा अंकुश हा सोमवारी दुपारच्या सुमारास (4 मार्च) पाण्यात पोहण्यासाठी गेला होता. त्याच्या सोबत त्याचा प्रथमेश जाधव होता. अंकुश पोहण्यासाठी नदी पत्रात उतरला मात्र अंकुशला पाणी खोल असल्याचा अंदाज आला नाही. अंकुश पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील 'या' भागांत मंगळवारी (दि. १२) वीजपुरवठा बंद राहणार

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10343,10339,10333″]

अंकुश पाण्यात बुडत असल्याचं प्रथमेश जाधव यांच्या लक्षात आले. प्रथमेशने त्वरित पाण्यात उडी मारली. परिसरातील नागरिकांना घटना कळल्याने अग्निशमन दलाला कळविण्यात आले. गावकरी आणि अग्निशमन दलाच्या मदतीने अंकुश ला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. मात्र उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अंकुशाच्या अशा अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790