नाशिक: महापालिकेकडून सव्वादोन लाख दाखल्यांची तपासणी, 3224 नोंदी

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): राज्य शासनाच्या सूचनेनुसार महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने १८९७ ते १९६७ पर्यंतचे कुणबी दाखले शोधण्याची मोहिमेत आत्तापर्यंत दोन लाख २३ हजार ९२४ दाखल्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यात तीन हजार २२४ कुणबी दाखल्यांची नोंद आढळून आली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यातील उपोषणाची सांगता करताना डिसेंबरअखेरपर्यंत राज्य सरकारला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी मुदत दिली आहे.

हे ही वाचा:  महत्वाची बातमी: रेल्वे तिकीट आरक्षणाच्या नियमात मोठा बदल; फक्त इतके दिवस आधी करता येणार बुकिंग

त्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणबी दाखले शोधण्याची मोहीम राबविण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनेनुसार महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने कुणबी दाखले शोधण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: चेन स्‍नॅचरसह दोघा सराफांना 3 वर्षे सश्रम कारावास !

महापालिकेच्या शिक्षण विभागाने १८९७ ते १९६७ या कालावधीतील एकूण दोन लाख तेवीस हजार ९०४ दाखले आतापर्यंत तपासले. त्यामध्ये कुणबी नोंद असलेले ३२४, तर मराठा कुणबी नोंद असलेले ४५ दाखले प्राप्त झाले. कुणबी मराठा अशी नोंद असलेले १७ दाखले आढळून आले आहे.

आत्तापर्यंत जवळपास तीन हजार २८६ कुणबी दाखल्यांची नोंद महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे आहे. दाखले शोधण्यासाठी साडेचारशे शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: ऑनर किलिंग प्रकरणी सुप्रीम कोर्टात आरोपीला २० वर्षे कारावास

दाखले शोधताना १९३५ पर्यंतचे दाखले मोडी लिपीत असल्याने दाखल्यांची तपासणी करताना अडचणी निर्माण होत आहेत. महापालिकेकडे मोडी लिपीचे तज्ज्ञ उपलब्ध नसल्याने तज्ज्ञांना मागणी वाढली असून, महापालिकेकडून देखील अशा व्यक्तींची नियुक्ती केली जाणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790