नाशिक: शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी तीन वर्षांचा कारावास

नाशिक: शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी तीन वर्षांचा कारावास

नाशिक (प्रतिनिधी): शाळकरी मुलींना घरात बोलावून घेत त्यांच्यासमोर अश्लील चाळे करत विनयभंग केल्याची घटना इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन वर्षांपूर्वी घडली होती.

याप्रकरणी पोलिसांनी विनयभंग व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

या खटल्याची अंतिम सुनावणी सोमवारी (दि. २६ सप्टेंबर) जिल्हा व सत्र न्यायालयात झाली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मिशन ग्रीन मान्सून उपक्रमांसाठी सरसावले नाशिककर ! ३५०० नागरिकांना घरपोच रोपांचे वाटप

यावेळी विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश डी.डी. देशमुख यांनी आरोपी माणिक चोखाजी खिल्लारे (३५) यास तीन वर्षाचा कारावास व तीन हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: निवासी इमारतीतील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश; मुख्य संशयित अटकेत, तीन महिलांची सुटका

शाळकरी मुली घरी खेळण्यासाठी गेल्या असता आरोपी माणिक याने अश्लील चाळे करत ३० डिसेंबर २०१९ रोजी विनयभंग केला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक प्रवीण बाकळे यांनी त्यास १ जानेवारी २०२० साली अटक करून न्यायालयापुढे हजार केले होते. तेव्हा न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. बकले यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारी पक्षातर्फे ऍडव्होकेट दीपशिखा भिडे यांनी युक्तिवाद केला. यावेळी फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व बकले यांनी सदर केलेले परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने माणिक यास दोषी धरले. भिडे यांनी यावेळी न्यायालयात सात साक्षीदार तपासले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790