नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
नाशिक: लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर तब्बल पाच वर्ष बलात्कार, गुन्हा दाखल
नाशिक (प्रतिनिधी): लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर तब्बल पाच वर्ष बलात्कार केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयिताने लग्नास टाळाटाळ व मारहाण करीत अश्लिल फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याने ३२ वर्षीय तरुणीने पोलिसात तक्रार केली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयराम श्रीराम पुरी (३७ रा.ठक्कर रित्रेत बिल्डींग प्रमोद महाजन गार्डन समोर जुना गंगापूरनाका) असे संशयिताचे नाव आहे.
पीडिता व संशयित गेल्या काही वर्षांपूर्वी एका अस्थापनेत काम करीत होते. त्यामुळे दोघांच्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले होते. कालांतराने संशयिताने कच्या तेलाचा व्यवसाय सुरू केल्याने त्याने प्रमोद गार्डन भागात आपले कार्यालय थाटले होते.
- नाशिक: टायर जाळायला गेले अन् पोलिस चौकीच पेटवून बसले; मद्यपींचा पहाटेचा प्रताप
- नाशिक: बहिणीची छेड काढल्याच्या वादातून पंचवटीत युवकाचा खून
तरूणीने आपली नोकरी सोडल्याने तिचे संशयिताच्या ऑफिसमध्ये येणे जाणे होते. फेब्रुवारी २०१८ मध्ये संशयिताने युवतीकडे लग्नाची गळ घातली. लग्नाचे आमिष दाखवित त्याने आपल्या कार्यालयात व वेगवेगळया ठिकाणी घेवून जात तिच्यावर बलात्कार केला. दोघांच्या प्रेमप्रकरणास पाच वर्ष उलटूनही संशयित लग्नाबाबत निर्णय घेत नसल्याने युवतीने त्याच्याकडे तगादा लावला असता ही घटना घडली. संशयिताने तरूणीस मारहाण करीत तिचे अश्लिल फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याने युवतीने पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गौतम सुरवाडे करीत आहेत.