नाशिक: पावसाळा संपल्यानंतरच रस्ते खोदण्यासाठी परवानगी; अन्यथा गुन्हे दाखल होणार

फोडताना आढळल्यास गुन्हा दाखल करण्याच्या सूचना

नाशिक (प्रतिनिधी): पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध खासगी कंपन्यांना रस्ते फोडण्यासाठी दिलेली मुदत संपुष्टात आली असून, बांधकाम विभागाने नव्याने केलेली मागणी फेटाळून लावली आहे.

त्यामुळे आता यापुढे पावसाळा संपल्यानंतरच कंपन्यांना रस्ते खोदण्यासाठी परवानगी मिळणार आहे जर रस्ता फोडताना आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

गेला काही वर्षात शहरात जवळपास बाराशे कोटी रुपयांचे रस्ते तयार करण्यात आले. मात्र रस्ते तयार होत असताना दुसरीकडे फोडण्याचेदेखील काम झाले. महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनी लिमिटेड, बीएसएनएल, तसेच खासगी कंपन्यांच्या माध्यमातून फायबर ऑप्टिकल केबल टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्ते खोदण्यात आले.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात 1 जानेवारीपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

एमएनजीएल अर्थात महानगर गॅस लिमिटेड कंपनीमार्फत सध्या जवळपास 187 किलोमीटरचे रस्ते खोदण्यात आले आहे. या रस्ते खोदकामामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास होत असून, अनेक ठिकाणी अपघात होण्याचे प्रकारदेखील घडत आहे.

हे ही वाचा:  Weather Alert: 27-28 डिसेंबरदरम्यान राज्यात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

वीजपुरवठा, पाणीपुरवठा खंडित होणे यासारख्या प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. मागील वर्षी पावसाळ्यातच रस्ते खोदाई काम केल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात अपघात झाले होते. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून खड्डे खोदण्यासाठी अल्टिमेटम देण्यात आला होता.

10 मेस रस्ते फोडण्यासंदर्भात दिलेली मुदतवाढ संपुष्टात आली. महानगर गॅस लिमिटेड कंपनीने मुदतवाढ देण्याची मागणी बांधकाम विभागाकडे केली. परंतु सदर मागणी लावत गुरुवार (ता. ११) पासून शहरातील रस्ते फोडण्यास व रस्त्यांवर काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

हे ही वाचा:  नाशिक सिटीझन्स फोरमतर्फे आज (दि. २६) संवादसत्र

रस्ता फोडण्याचे आढळून आल्यास महापालिका कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे तर थेट फौजदारी गुन्हादेखील दाखल करण्याचा इशारा शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी दिला.

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790