Amazon

नाशिक: विदेशात अ‍ॅडमिशन घेऊन देण्याच्या बहाण्याने चार लाखांची फसवणूक

नाशिक (प्रतिनिधी): विदेशात शिक्षणासाठी अ‍ॅडमिशन घेऊन देतो, असे सांगून गुजरातमधील चार जणांनी एका युवतीला चार लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

मीरा नलिन पटेल (वय 26, रा. दत्त चौक, सिडको, नाशिक) असे फसवणूक झालेल्या तरुणीचे नाव आहे. पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की आरोपी हार्दिक गांगोडे (रा. सयाची पार्क, बडोदा), राजन मोहनलाल नंदवाणी (रा. श्रीजी निवास, सुरत), चिंतन कुमार सिंगाला (रा. अवध, सुरत) व प्रियंका शहा (पूर्ण पत्ता माहीत नाही) यांनी दि. 27 ऑगस्ट 2022 ते 10 मे 2023 या कालावधीत मीरा पटेल यांच्याशी संपर्क साधला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त त्र्यंबकेश्वरच्या वाहतुकीत महत्वाचे बदल

फिर्यादी यांना विदेशात शिक्षणासाठी अ‍ॅडमिशन घेऊन देतो, असे सांगितले. आरोपींनी दिलेल्या माहितीवर फिर्यादी यांचा विश्‍वास बसला. त्यानंतर चारही आरोपींनी पटेल यांच्याकडून वेळोवेळी बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने 3 लाख 98 हजार 442 रुपयांची रक्‍कम स्वीकारली; मात्र विदेशात अ‍ॅडमिशन मिळवून न देता फसवणूक केली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गोदातीरावर सिंहस्थाचा शंखनाद; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण !
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790