नाशिक: तरुणीला ब्लॅकमेल करून वेश्या व्यवसायात ढकलले; सुराणा दाम्पत्याविरुध्द गुन्हा दाखल

नाशिक: तरुणीला ब्लॅकमेल करून वेश्या व्यवसायात ढकलले… सुराणा दाम्पत्याविरुध्द गुन्हा दाखल

नाशिक (प्रतिनिधी): नोकरीचे आमिष दाखवून जवळीक साधून नंतर ब्लॅकमेल करून २१ वर्षीय तरूणीस वेश्या व्यवसायास लावणाऱ्या दाम्पत्याविरुध्द पंचवटी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पती पाठोपाठ आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांना पाठवून पीडितेवर बलात्कार करण्यात आल्याचे समोर आले आहे. यापूर्वीही संशयित दाम्पत्यावर फसवणुकीसह पिटाअंतर्गत गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खुशबू सुराणा आणि परेश सुराणा असे संशयित दाम्पत्याचे नाव आहे. हिरावाडी भागात राहणा-या २१ वर्षीय पीडितेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. नोकरीच्या शोधार्थ शहरात एकट्या राहणा-या तरूणीची गेल्या फेब्रुवारी महिन्यात सुराणा दाम्पत्याशी ओळख झाली होती. नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविण्यात आल्याने तरूणी व दाम्पत्याचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते.

हे ही वाचा:  नाशिक: आयशर ट्रक व रिक्षाचा अपघात; ४५ वर्षीय इसम ठार…

एके दिवशी या दाम्पत्याने तरूणीचे घर गाठून आपल्याला शॉपिंगला जायचे आहे असे म्हणून तरूणीस मार्केटमध्ये सोबत येण्याचा आग्रह धरला. त्यानंतर ती तरूणी आपल्या बेडरूममध्ये कपडे बदलण्यासाठी गेली. त्याचवेळी युवतीचे लक्ष नसल्याची संधी साधत संशयित व त्याच्या पत्नीने आपआपल्या मोबाईलमध्ये चोरीछुपे युवतीचे फोटो व व्हिडीओ काढले.

हे ही वाचा:  नाशिक: शहरात महावितरणचे छापे; वीज चोरीचे गुन्हे दाखल !

या घटनेस दोन दिवस उलटत नाही तोच परेश सुराणा हा मद्याच्या नशेत युवतीच्या घरी पोहचला. अश्लिल व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत परेशने तरुणीवर बलात्कार केला. त्यानंतर परेश हा वेळोवेळी या तरुणीवर बलात्कार करत राहिला. स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वेगवेगळ्या पुरूषांसोबत शारिरीक संबध ठेवण्यासही या तरुणीला त्याने भाग पाडले.

हे ही वाचा:  बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी तर दहावीची २१ फेब्रुवारीपासून

तब्बल दहा दिवस हा लैंगिक अत्याचार सुरू होता. संशयित दाम्पत्याचा अतिरेक वाढल्याने युवतीने पोलिसात धाव घेतली असून, पोलिस सुराणा दाम्पत्याचा शोध घेत आहेत. यासंदर्भात पंचवटी पोलिस ठाण्यात परेश सुराणा व खुशबू सुराणा यांच्या विरोधात भारतीय दंड विधान  376 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे (पंचवटी पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक: 0233/2023). अधिक तपास उपनिरीक्षक योगेश माळी करीत आहेत.

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790