नाशिक: ठाण्याच्या कुटुंबाला नाशिकचे बोटॅनिकल गार्डन पाहणे पडले महागात!

नाशिक: ठाण्याच्या कुटुंबाला नाशिकचे बोटॅनिकल गार्डन पाहणे पडले महागात!

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडी, चोरी, भुरट्या चोऱ्या अशा गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली दिसत आहे.

अशातच ठाण्याहून आलेल्या बोरसे कुटुंबाला बोटॅनिकल गार्डन पाहणे चांगलेच महागात पडले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक-नांदुरी रस्त्याच्या रुंदीकरण कामाची पाहणी; गुणवत्ता निकषांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश

पर्यटनानिमित्त आलेल्या ठाणे येथील एका कुटुंबीयांस बोटॅनिकल गार्डन बघणे चांगलेच महागात पडले.

त्यांनी पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह मोबाईल, आयपॅड असा सुमारे ९१ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी स्वप्नील विजय बोरसे (रा. ठाणे) यांनी तक्रार दाखल केली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेंतर्गत स्व-गणना पत्रक न भरलेल्या मतदारांनी 17 ऑगस्टपर्यंत भरावेत

बोरसे कुटुंबीय रविवारी (ता. ६) शहरात पर्यटनासाठी आले होते. दुपारी देवदर्शन आटोपून बोरसे कुटुंबीय परतीच्या प्रवासात पांडव लेणी भागात असलेल्या बोटॅनिकल गार्डन भागात गेले असता ही घटना घडली. महामार्गाच्या सर्व्हीस रोडवर (एमएच- ०४- केआर ६६७०) कार पार्क करून कुटुंबीय गार्डनमध्ये गेले असता चोरट्यांनी खिडकीची काच फोडून मागील पर्स चोरून त्यातील सोनसाखळी, अंगठ्या, ब्रेसलेट, मोबाईल, आयपॅड असा सुमारे ९१ हजाराचा ऐवज चोरून नेला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790