नाशिक: गृह कर्जासाठी बनावट कागदपत्रे देऊन स्टेट बँकेची 86 लाखांना फसवणूक

नाशिक: गृह कर्जासाठी बनावट कागदपत्रे देऊन स्टेट बँकेची 86 लाखांना फसवणूक

नाशिक (प्रतिनिधी): स्टेट बँक ऑफ इंडियाला ८६ लाखाला गंडा घातल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्राच्या आधारे गृहकर्ज मिळवून सात कर्जदारांनी गृह खरेदी केल्याचे दाखवून ही फसवणूक केली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: ऑनर किलिंग प्रकरणी सुप्रीम कोर्टात आरोपीला २० वर्षे कारावास

पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारीनुसार विवेक उगले, अजय आठवले, रोशनी जयस्वार, संतोष जयस्वार, राजू कलमट्टी, अश्विन साळवे व किरण आठवले अशी ठकबाज कर्जदारांची नावे आहेत. या सर्वांनी २०२१ मध्ये गृहकर्जासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाकडे प्रस्ताव सादर केले होते. एन.डी.पटेल रोडवरील केंद्रीय कार्यालयाने कागदपत्राच्या आधारे संबधितांना गृहकर्ज मंजूर केल्याने सदरच्या रकमा वेगवेगळया बँकेखात्यात वर्ग करण्यात आल्या होत्या.

हे ही वाचा:  नाशिक: स्टॉक ट्रेडिंगच्या बहाण्याने दाम्पत्याने केली दोन लाखांची फसवणूक

मात्र कर्जाची हप्ते संबधितांनी वेळेवर भरले नाही. त्यामुळे बँकेच्या वतीने मालमत्तांसह कर्जदारांचा शोध घेण्यात आला असता हा बनाव समोर आला आहे. बँकेने कागदपत्रांची शहानिशा केली असता बनावट कागदपत्राच्या आधारे या कर्जदारांनी हा गंडा घातला असून याप्रकरणी व्यवस्थापक प्रकाश सावंत यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पिसे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790