नाशिकमध्ये काकासह पुतण्या आणि पुतणीवर त्रिकुटाचा प्राणघातक हल्ला

नाशिकमध्ये काकासह पुतण्या आणि पुतणीवर त्रिकुटाचा प्राणघातक हल्ला

नाशिक (प्रतिनिधी): देवळाली गावात गळ्य़ातील सोनसाखळी बघण्यास विरोध केल्याने त्रिकुटाने काकासह पुतण्या आणि पुतणीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत तिघे जखमी झाले आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गणेशोत्सवासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त; नाशिकमधील ४०२ सराईत गुन्हेगार तडीपार

निलेश कुमावत, पियूश शिंदे व सचिन जावरे (रा. तिघे सुंदरनगर, देवळाली गाव) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी रमेश हिरामण मोरे (४० रा.सुंदरनगर, देवळाली गाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. मोरे गुरूवारी (दि.१८) रात्री आपल्या घरासमोर उभे असतांना संशयितांनी त्यांना गाठले. यावेळी चेष्टामस्करीत टोळक्याने त्यांच्याकडे गळ्यातील सोनसाखळी बघू दे असा आग्रह धरला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: लोखंडी पाइपला दुचाकी धडकून तरुणाचा मृत्यू

मोरे यांनी चैन दाखविण्यास नकार दिल्याने संतप्त संशयितांनी त्यांना शिवीगाळ केली. यावेळी मोरे यांच्या पुतण्या रूतीक मोरे आणि पुतणी सोनल मोरे हे आपल्या काकाच्या बचावासाठी धावून गेले. तर, टोळक्याने काका पुतण्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत काही तरी धारदार हत्याराचा वापर करण्यात आल्याने काकासह पुतण्या व पुतणी जखमी झाली असून अधिक तपास पोलिस निरीक्षक पगारे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790