नाशिक: कॅनडा कॉर्नरला मसाज पार्लरच्या नावाखाली सुरु असलेला वेश्या व्यवसायाचा अड्डा उध्वस्त

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिक: कॅनडा कॉर्नरला मसाज पार्लरच्या नावाखाली सुरु असलेला वेश्या व्यवसायाचा अड्डा उध्वस्त

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या उच्चभ्रू ठिकाणी मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा अड्डा मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उध्वस्त केला आहे.

🔎 हे वाचलं का?:  येवल्याच्या पैठणीचा राष्ट्रीय गौरव; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येवला पैठणीच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शरणपूर रोड वरील सुयोजित मॉडर्न पॉईंट या इमारतीत एक महिला आरोपी आणि संशयित ललित पांडुरंग राठोड या दोघांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पीडित महिलांना पैशाचे प्रलोभन देऊन महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. योग वेलनेस स्पा या नावाने हे मसाज पार्लर सुरू केले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक-नांदुरी रस्त्याच्या रुंदीकरण कामाची पाहणी; गुणवत्ता निकषांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश

या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक सुनील माळी यांना मिळाली होती. छापा टाकल्यानंतर पोलिसनी तेथून  6 पीडित महिलांची सुटका केली आहे. संशयित आरोपी अनेश अरुण उन्हवणे याने गाळा मालक इसम नामे-  सागर ओमकार अग्रवाल आणि पियुष ओमकार अग्रवाल यांचेकडून गाळा भाडे तत्वावर घेऊन त्यांना उपलब्ध करून दिला. याबाबत या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790