आतापर्यंत १०३ गणेशमंडळांना मिळाली ऑनलाईन परवानगी….

NPA GOLD LOAN

नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रादुर्भाव बघता यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्याचप्रमाणे यंदा मिरवणुकीवरसुद्धा बंदी घालण्यात आली आहे. तसेच गणेशमंडळांना ऑनलाईन अर्ज भरून परवानगी घेण्यास सांगितले होते. महापालिकेकडे आलेल्या ऑनलाईन अर्जांपैकी एकूण १०३ मंडळांना आत्तापर्यंत परवानगी देण्यात आली आहे.

उच्च न्यायालयाने गणेशोत्सव मंडळांना उत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेची परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. गणेश उत्सवात मंडप टाकले जातात त्यासाठी उच्च न्यायालयाने नियमावली जारी केली होती. अर्ज करतांना मंडप उभारण्यासाठी स्थलदर्शक नकाशा, धर्मादाय उपयुक्तांकडील नोंदणी पत्र, पोलीस, वाहतूक आणि अग्निशमन या तिन्ही विभागाकडील न हरकत प्रमाणपत्र, सार्वजनिक मंडळाचे नाव, पत्ता तसेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे सादर करावयास सांगितली होती. त्यानंतर विभागीय अधिकाऱ्यांमार्फत अर्जांची छाननी केली गेली. पोलीस शहर वाहतूक शाखा, अग्निशमन विभागाकडून न हरकत दाखला मिळाल्यानंतर उत्सवाच्या सात दिवसांपूर्वी प्रमाणपत्र देऊन आतापर्यंत एकूण १०३ मंडळांना मंडप उभारण्यासाठी परवानगी देण्यात आली.

Loading

हे ही वाचा:  नाशिक: अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
Get Instant Updates