अग्नीशमन अधिकारी व जवानांचा रोटरी क्लब ऑफ नाशिक नाईन हिल्स तर्फे सत्कार

नाशिक (प्रतिनिधी): २६/११ च्या  मुंबईतील अतिरिकी हल्ल्यात फायर ब्रीगेड (अग्नीशमन दलाने) कामगिरी बजावतांना वीरमरण आलेल्या जवानांना श्रदांजली देण्यात आली. तसेच नाशिक येथे कार्यरत असलेल्या अग्निशमन जवानांचे मनोधर्य वाढवण्यासाठी अग्नीशमन अधिकारी व कार्यरत असलेल्या जवानांचा व  पोलिसांचा  रोटरी क्लब ऑफ नाशिक नाईन हिल्स तर्फे सन्मान चिन्ह व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ नाशिक नाईन हिल्स च्या अध्यक्षा रोटेरियन कल्पना शिंपी, मेजर कृष्णा खोत,  प्रकाश प्रधान, विश्वास शिम्पी, रोटे. धनंजय बेळे, असीस्टंट गव्हर्नर  सौ. प्रेरणा बेळे , सौ. आशा पगार, ललित पगार,  विराज गडकरी, आदी होते.

हे ही वाचा:  बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी तर दहावीची २१ फेब्रुवारीपासून

२६/११ चा हल्ला होत असताना मुंबईतील ताजमहल पॅलेस  हॉटेलचे प्रमुख सुरक्षा संचालक श्री. अजयजी बिर्हाडे यांना विशेष गौरव पत्र देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी बोलताना अजय बिर्हाडे यांनी हल्याच्या  वेळी ताज हाँटेलचे कर्मचारी मुंबई अग्नीशमन दलाचे जवान, पोलीस अधिकारी व एनएसजी कमांडो यांनी एकत्रित मिळून तो हल्ला कसा यशस्वी पणे परतवून लावला त्याची माहिती उपस्थीतांना  दिली.  

नाशिक अग्नीशमन दलाचे अंबड येथील मुख्य  अधिकारी आशीष मोरे यांनी नागरिकांनी आगी लागल्याच्या वेळी घ्यावयाची  काळजी याबद्दल माहिती दिली. थर्मल पॅावर स्टेशनचे सुरक्षा अधिकारी शेलार यांनी थर्मल पावर स्टेशनला काम करताना कुठल्या प्रकारचे धोके उद्भभवतात याची माहिती दिली.सत्काराला उत्तर देताना सातपूर अग्नीशमन दलाचे अधिकारी परदेशी यांनी अवघड परिस्थितीत अग्नीशमन दल नागरिकांना कशी  मदत करते याबद्दल माहिती दिली. सिडको अग्नीशमन दलाचे सोनावणे  यांनी आपत्काळात अग्नीशमन दल लोकांना  कसे परस्पर सहकार्य करतात या विषयाच्य मनोरंजक गोष्टी सांगितल्या.

हे ही वाचा:  नाशिक जिल्हा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज; अशी आहे तयारी...

रोटरी क्लब नाईन हिल चे संस्थापक सदस्य धनंजय बेळे यांनी नागरिक अग्नीशमन दलासारख्या संस्थांच्च्या  कायमच पाठीशी राहतील  अशी सत्कार मूर्तीना ग्वाही दिली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन विराज गडकरी यांनी केले. यावेळी सचिन शिन्दे, नरेंद्र शालिग्राम , अर्चना शालिग्राम, ललित पगार, आशा पगार, अतुल कुलकर्णी, संगीता कुलकर्णी, वैभव चावक, शिल्पा चावक, खोत आदी होते.

हे ही वाचा:  नाशिक: आयशर ट्रक व रिक्षाचा अपघात; ४५ वर्षीय इसम ठार…

याप्रसंगी नाशिक, अंबड, सातपूर  येथील अग्नीशमन दलाच्या अधिकारी व जवानांचा कुटुंबियांसमवेत सत्कार केले. कार्यक्रम आयोजन व यशस्वितेसाठी विश्वास शिंपी, हेमंत खोंड व विजय जोशी यांनी विशेष परीश्रम घेतले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790