बनवट देशी दारू बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांचा छापा: 1 करोड रुपयांचा मुद्देमाल जप्त!
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक ग्रामीण पोलीसांनी आणखी एक धडक कारवाई करत सायखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील बनावट देशी दारू बनविण्याऱ्या कारखान्यावर मोठी कारवाई करत करोडो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पुन्हा एकदा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या आदेश आणि मार्गदर्शनासार नाशिक ग्रामीण पोलिसांनी बनावट देशी मद्याच्या कारखान्यावर कार्यवाई करून करोडो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
त्यांच्या या कारवाईचे कौतुक केलं जातं आहे. सायखेडा पोलीस ठाणे हद्दीत चांदोरी शिवारात उदयराजे लॉन्समध्ये अवैधरित्या बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असलेबाबतची गोपनीय माहिती नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली होती.
त्याप्रमाणे ग्रामीण पोलीस पथकाने चांदोरी शिवारात उदयराजे लॉन्सवर दिनांक ११ ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजता अचानक छापा टाकला असता सदर ठिकाणी संजय मल्हारी दाते, वय – ४७ वर्षे, रा-गोंदेगाव ता.निफाड जि. नाशिक हा मिळुन आला असुन त्याचे कब्जात बनावट देशी दारूचे अंदाजे १५०० ते २००० बॉक्स, अंदाजे १०,००० ते १५,००० देशी दारू रिकाम्या बाटल्या, स्पिरीट अंदाजे २० हजार लिटर २०० लिटरचे ९० ते १०० बॅरेल, रिकामे बॉक्स अंदाजे ५००० ते १०,०००, देशी दारू बनविण्याचे साहित्य, पाण्याच्या टाका ०५ व ०१ ट्रक असा एकुण अंदाजे ०१ करोड रूपयांचा मुददेमाल ताब्यात घेतला आहे. सदर देशी दारू कारखाना अंबादास विठोबा खरात यांचे मालकीचे उदयराजे लॉन्स मध्ये सुरू होता.
त्यामुळे करोडो रुपयांचा बनावट देशी दारू बनवण्याच्या कारखाण्यावर केलेल्या कारवाईचं, पोलिस अधीक्षक सचिन पाटील व नाशिक ग्रामीण पोलिस दलाचे सर्वच स्थरातून कौतुक केले जात आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास पोलीस अधिक्षक, नाशिक ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे…