नाशिक शहरात अपार्टमेंटवर दरोडा पडण्यापुर्वीच पोलिसांची झडप

नाशिक (प्रतिनिधी): शहरातील शिवकॉलनीतील एका अपार्टमेंट मध्ये दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीवर पोलिसांनी ऐन वेळेस झडप घातली.

अटकेतील पाच संशयीतांकडून गावठी पिस्तूल,चाकू,कटरसह दरोड्याचे साहित्य मिळून आले आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामानंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, शहरातील शिवकॉलनीतील १०० फूट रस्त्याला लागून प्रतीक पार्क अपार्टमेंट जवळ रविवार(ता. ३०)रोजी दरोड्याच्या तयारीनीशी गुन्हेगारांची टोळी टेहाळणी करत असल्याची गुप्त माहिती निरीक्षक शिल्पा पाटील यांना मिळाली.

हे ही वाचा:  नाशिक: ऑनलाइन टास्कच्या बहाण्याने युवकांना १९ लाखांचा गंडा

👉 नाशिक: अपघातात ८ वर्षांची मुलगी गेली, बापाने रस्त्यावरच हंबरडा फोडला…

त्यांच्या गुन्हेशोध पथकातील उपनिरीक्षक गोपाल देशमुख, संजय सपकाळे, सुशिल चौधरी,रेवानंद साळुंखे, रविंद्र चौधरी, राजेश चव्हाण, विजय खैरे,अतुल चौधरी, उमेश पवार,अनिल सोननी, दिपक वंजारी अशांच्या पथकाने प्राप्त माहितीचा पाठलाग करत प्रतिक अपार्टमेंट जवळ संशयीत रित्या फिरतांना मिळून आलेल्यांची चौकशी केली.

हे ही वाचा:  RTO Nashik: रद्दी विक्रीसाठी 18 मार्च पर्यंत निविदा सादर करण्याचे आवाहन

त्यात खुशाल विनोद पांडे, नागेश प्रल्हाद सोनार, मयूर ऊर्फ विकी दीपक अलोने, दुर्गेश उर्फ पपई आत्माराम संन्याशी आणि वसीम हुसेन पटेल (सर्व रा. जळगाव)अशांना अटक करण्यात आली.

हे ही वाचा:  नाशिक: भरधाव दुचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघातात २७ वर्षीय तरूणाचा मृत्यू

संशयीतांकडून एक गावठी पिस्तूल, लोखंडी पाईप, चाकू, सुरा, लोखंडी हातोडी, हेक्सा ब्लेड, मिरची पुड, दोन गुप्त्या, कालाहिट स्प्रे,पेंचीस, हतोड्या, हेक्सॉब्लेड,दोरी, असे साहित्य पेालिसांनी जप्त केले असून संशयीतांच्या विरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी रविंद्र चौधरी यांच्या फिर्यादीवरुन गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून तपास उपनिरीक्षक गोपाल देशमुख करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790