नाशिक शहरातील या भागांत सोमवारी (दि. २३ जानेवारी) पाणीपुरवठा नाही…

नाशिक शहरातील या भागांत सोमवारी (दि. २३ जानेवारी) पाणीपुरवठा नाही…

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील या भागात सोमवारी (दि. २३ जानेवारी) पाणीपुरवठा होणार नसल्याचे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे.

पंचवटी विभागातील आर. पी. जलकुंभ, हनुमानवाडी जलकुंभ व मोरे मळा जलकुंभ भरणारी उर्ध्ववाहिनीस पंचवटी जलशुध्दीकरण केंद्रामधील आवारात क्रॉस कनेक्शन काम करण्यासाठी सोमवारी या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: म्हसरुळला सिटीलिंक बसच्या धडकेत युवकाचा मृत्यू

सोमवार २३ जानेवारी रोजी हे काम केले जाणार आहे. त्यामुळे आर. पी. जलकुंभ, हनुमानवाडी जलकुंभ व मोरे मळा जलकुंभ यावरुन प्र.क्र.४, ५ व ६ मधील जुने पंचवटी गावठाण परिसर, सेवाकूंज, गजानन चौक, गुरूद्वारा रोड, ढिकले नगर, सरदार चौक, नाग चौक,, सिता गुंफा रोड, काळाराम मंदिर परिसर ते शनिचौक, सुकेनकर लेन, पंचवटी राजवाडा, आर.पी टाकी परिसर, वाल्मीकनगर, संजय नगर, वाघाडी लगतचा परिसर तसेच…

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: रेकी करून घरफोड्या करणारे दोन सराईत अटकेत; ७ घरफोड्या उघड

गजानन कॉलनी, वाघ मळा, जगझाप मार्ग व मखमलाबाद रोडवरिल लगतचा परिसर, मधुबन कॉलनी, जाधव कॉलनी, नवनिर्माण चौक, उदय कॉलनी, कृष्णगनर, ड्रीमकॅसल परिसर, जाणता राजा कॉलनी काही परिसर, क्रांतीनगर, शिंदे मळा, वृंदावन नगर, प्रोफेसर कॉलनी, नागरे मळा, मोरे मळा, हनुमान वाडी, चौधरी मळा, तुळजा भवानी नगर इत्यादी परिसरात सोमवार २३ जानेवारी रोजीचा संध्याकाळचा पाणीपुरवठा होणार नाही व मंगळवार २४ जानेवारी रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल याबाबत परिसरातील नगरिकांनी नोंद घेऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभाग वितरणचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790