नाशिक शहरातील या भागांत शुक्रवारी (दि. २२ जुलै) पाणीपुरवठा नाही

नाशिक शहरातील या भागांत शुक्रवारी (दि. २२ जुलै) पाणीपुरवठा नाही

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील पाणीपुरवठ्याबाबत नाशिक महानगरपालिकेने महत्वाची सुचना दिली आहे.

नाशिक शहरातील काही भागांत शुक्रवारी (दि. २२ जुलै) पाणीपुरवठा होणार नाहीये.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

नाशिक रोड जलशुद्धीकरण केंद्राच्या जलकुंभावर पाइपलाइन जोडणीचे काम हाती घेतले जाणार आहे. कामाचे स्वरूप मोठे असल्याने विलंबाने काम होईल. त्यामुळे नाशिक रोड विभागातील प्रभाग क्रमांक २० मधील नवले चाळ विभागीय आयुक्त कार्यालय व प्रभाग क्रमांक १९ मधील ओढा रोड व परिसरात शुक्रवारी (ता. २२) पाणीपुरवठा होणार नाही. तसेच, शनिवारी (ता. २३) सकाळी पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांकडून कळविण्यात आले आहे

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790