नाशिक: शतपावली करतांना वाहनाने दिलेल्या धडकेत नवविवाहितेचा मृत्यू

नाशिक: शतपावली करतांना वाहनाने दिलेल्या धडकेत नवविवाहितेचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): शतपावली करतांना वाहनाने दिलेल्या धडकेत नवविवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सारिका सचिन निकम असे त्यांचे नाव आहे.

महिन्याभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता…

पाथर्डी गावाच्या पुढे रात्री पतीसोबत शतपावली करत असताना चारचाकी वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने एक महिन्यापूर्वीच लग्न झालेल्या सारिका सचिन निकम (२६) या गंभीर जखमी झाल्या होत्या.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

याबाबत इंदिरानगर पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सारिका निकम (रा. स्वराजनगर) या रात्री पतीसोबत रस्त्याच्या कडेला शतपावली करत असताना पाथर्डी फाट्याकडून येणाऱ्या अनोळखी कारने त्यांना पाठीमागून धडक दिली. या धडकेत निकम या गंभीर जखमी झाल्या होत्या. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दुर्दैवाने त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, सासू-सासरे असा परिवार अाहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790