नाशिक: जन्मदात्या आईनेच सुपारी देऊन केली मुलाची हत्या

नाशिक: जन्मदात्या आईनेच सुपारी देऊन केली मुलाची हत्या

नाशिक (प्रतिनिधी): जन्मदात्या आईनेच सुपारी देऊन मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मनोरुग्ण असलेल्या मुलाचा त्रास असह्य झाल्याने आईनेच पोटच्या मुलाची १५ हजार रुपयांची सुपारी देत हत्या केल्याचा प्रकार नांदगाव तालुक्यातील ढेकू येथे घडला.

हत्या झालेल्या जनार्दन पेंढारे याची आई जन्याबाईने मुलाची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: पतीनेच केला चारित्र्याचा संशयावरून पत्नीचा खून

सुपारी घेणारा संशयित समाधान दौलत भड याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

जन्याबाई यांनी पोलिसांत मुलाला फिट येत असून मनोरुग्ण असल्याने गावातील समाधान भड यास मुलाला मारण्यासाठी १५ हजार रुपये दिले. भड याने गुरुवारी जनार्दनच्या डोक्यात पहारीने घाव घालत ठार मारले. मृतदेह साईनाथ राठोड यांच्या शेतात फेकून दिला. घटनेची माहिती समजल्यावर अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपविभागीय अधिकारी समीरसिंग साळवे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे, सहायक निरीक्षक दीपक सुरवडकर, उपनिरीक्षक मनोज वाघमारे, अनिल गांगुर्डे, सागर कुमावत करत आहे.

हे ही वाचा:  Breaking: चांदवडच्या राहुड घाटात ट्रक-बसचा भीषण अपघात; ४ जणांचा मृत्यू

नांदगाव तालुक्यातील ढेकू येथील घटना

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790