नाशिक: रिक्षा आणि आयशर ट्रकमध्ये धडक:१ ठार, २ जखमी; पंचवटीतील घटना

नाशिक: रिक्षा आणि आयशर ट्रकमध्ये धडक:१ ठार, २ जखमी; पंचवटीतील घटना

नाशिक (प्रतिनिधी): महामार्गावरील मिनाताई ठाकरे परिसरातील सर्व्हीस रोडवर अ‍ॅटोरिक्षा आणि आयशर मालट्रकमध्ये झालेल्या धडकेत रिक्षातील प्रवासी ठार झाला. बिरेश्वर बिजन देवनाथ (५४, रा.स्वामी अव्हेन्यू, रूंग्ठा बेलिसीओच्या बाजूला, पार्क साईट मागे) असे मृत प्रवाश्याचे नाव आहे.

या अपघातात रिक्षाचालकासह मयताचा प्रवासी मुलगा जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: अज्ञात वाहनाच्या धडकेत ५८ वर्षीय पादचारी ठार

मृत देवनाथ व त्यांचा मुलगा बुधवारी (दि.३१) सायंकाळच्या सुमारास रिक्षातून प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. एमएच १५ एफयू ०८८७ या रिक्षातून दोघे बापलेक बळीमंदिराच्या दिशेने सर्व्हीस रोडने जात असतांना समोरून भरधाव आलेल्या आयशर ट्रकने (एमएच १५ एच एच ४४१८) रिक्षाला धडक दिली.

या अपघातात पाठीमागे बसलेले देवनाथ यांचा मृत्यू झाला तर चालकासह त्यांचा मुलगा जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. अधिक तपास हवालदार देवराम वणवे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790