नाशिक: भरधाव मालट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील महिला ठार
नाशिक (प्रतिनिधी): महामार्गावरील जैन मंदिर भागात भरधाव मालट्रकने धडक दिल्याने दुचाकीवर डबलसिट प्रवास करणारी महिला ठार झाल्याची घटना घडली.
शोभाबाई तुकाराम ठोंबरे (४२ रा.राजरत्ननगर,सिडको) असे मृत महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात पसार झालेल्या अज्ञात ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शोभाबाई ठोंबरे या रविवारी (दि.५) सकाळच्या सुमारास पती तुकाराम पोपट ठोंबरे यांच्या सोबत दुचाकीवर (एमएच १५ एचएल २९९४) डबलसिट प्रवास करीत होत्या भोयेगावच्या दिशेने ठोंबरे दांम्पत्य प्रवास करीत असतांना आडगाव येथील जैन मंदिरासमोर पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने (एमएच ०५ के ९५४२) दुचाकीस धडक दिली.
- नाशिकमधील ‘या’ तीन खासगी शाळा बंद करण्याचा निर्णय: पालकांची फसवणूक
- नाशिक: मुंबई-आग्रा महामार्गावर कारचा अपघात; चार जण जखमी
- Breaking: नाशिकमध्ये ‘या’ खासगी सावकारी करणाऱ्या महिलेच्या घरावर छापा!
या अपघातात शोभाबाई गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्या डोक्यास वर्मी मार लागल्याने पती तुकाराम ठोंबरे यांनी तात्काळ नजीकच्या मेडिकल कॉलेज येथे त्यांना दाखल केले असता डॉ.प्राजक्ता देवरे यांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत पतीच्या तक्रारीवरून ट्रकचालकाविरूध्द पोलिस दप्तरी अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक तोडकर करीत आहेत.