नाशिक: प्रेमसंबंधांवरून वीस वर्षीय तरुणाची हत्या; तीन सख्ख्या चुलत भावंडांना अटक

नाशिक: प्रेमसंबंधांवरून वीस वर्षीय तरुणाची हत्या; तीन सख्ख्या चुलत भावंडांना अटक

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात खुनाचे सत्र सुरूच आहे.

शहरात प्रेमसंबंधांवरून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शालेय बस, व्हॅन चालकांनो नवीन नियमांची तीन महिन्यांच्या आत अंमलबजावणी करा; अन्यथा कारवाई

विशेष म्हणजे हे तिघेही सख्खे चुलत भावंड आहेत.

शहरामध्ये मागील आठवडाभरापासून खूनाचे सत्र सुरूच आहे. प्रेम संबंधावरून झालेल्या वादावरून एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला घाव वर्मी लागल्याने रुग्णालयात दाखल करेपर्यंत त्याचा मृत्यू झाला. या खून प्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य वर्षा पर्यटनासाठी तात्पुरते बंद; भूस्खलन, झाडे कोसळल्याने निर्णय

प्रेम संबंधावरून झालेल्या वादात उडी घेतल्यामुळे वडाळा रोडवरील शिवाजी वाडी झोपडपट्टी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या हाणामारीत एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला. घाव वर्मी लागल्याने रुग्णालयात दाखल करेपर्यंत त्याचा मृत्यू झाला. सागर प्रकाश रावतर (२०) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. या खून प्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली असून हे तिघेही सख्खे-चुलत भावंड आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790