नाशिक: नाशिकचे उद्योजक शिरीष सोनवणे खुनाचा उलगडा; ‘ह्या’ कारणामुळे केला खून…

नाशिक: नाशिकचे उद्योजक शिरीष सोनवणे खुनाचा उलगडा; ‘ह्या’ कारणामुळे केला खून…

नाशिक (प्रतिनिधी): उद्योजक शिरीष सोनवणे यांच्या हत्येचा उलगडा झाला असून सोनवणे यांचे अपहरण करुन खून करणाऱ्या तिघा संशयितांना पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.

गेल्या वीस दिवसांपासून या घटनेचा संपुर्ण पोलीस यंत्रणा तपास करत असलेल्या आव्हानात्मक खूनाचा उलगडा झाला असून तिघांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

नाशिकमधील बहुचर्चित उद्योजक शिरीष सोनवणे हत्या प्रकरणाचे गूढ उकलले असून या संदर्भात तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

साधारण महिनाभरापूर्वी नाशिकच्या एकलहरे परिसरातील फर्निचर व्यावसायिक शिरीष सोनवणे यांच्या खुनाच्या घटना घडली होती.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

त्या प्रकरणातील संशयित पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. प्रवीण पाटील, रामचंद्र कोंढाळकर व अजून एका संशयिताला नाशिकरोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान तिन्ही संशयितांना न्यायालयात हजर करण्यात येणार असून पोलिसांकडून त्यांच्या रिमांडची मागणी करण्यात येणार आहे. व्यावसायिक मत्सर ठरलं आहे ह्या खुनामागचं खरं कारण…

नाशिक शहरातील येथील एकलहरे रोड येथील फर्निचर व्यावसायिक व शाळेचे बेंच बनवणाऱ्या कारखान्याच्या संचालक शिरीष सोनवणे यांचा 9 सप्टेंबर म्हणजेच गणेश विसर्जनाच्या दिवशी कारखान्यातून अपहरणाची घटना घडली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह मालेगाव तालुक्यातील सातरपाडे शिवातील कालव्यात मिळून आला होता. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांकडे या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. त्याचबरोबर नाशिक पोलिसांसह विविध पथकांच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून सदर गुन्ह्यांचा तपास सुरू होता. शहर व तसेच ग्रामीण पोलीस या पुण्यातील संशयितांना पकडण्यासाठी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर प्रयत्न करत असताना सोनवणे यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागल्याची माहिती पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे दिली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

अपहरणाचा बनाव:
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयताच्या मोबाईल मधून सिमकार्ड काढून दुसरा मोबाईल घेतला होता. पहिला संशयित सापडला, त्याच्याकडून दुसऱ्या संशयितांची माहिती मिळाली. त्यास चाळीसगाव येथून अटक करण्यात आल्यानंतर तिसऱ्या संशयिताचा शोध लागला. सद्यस्थितीत या तिघांची पोलीस कोठडीत घेण्यासाठी पोलीस प्रयत्नशील असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी पकडलेल्या संशयितांपैकी प्रवीण काळे याचे अंबड परिसरात फेब्रिकेशन वर्कशॉप आहे. अपहरणासाठी वापरलेली कार मुंबईला गणपती पाहण्यासाठी जायचे असल्याचे कारण सांगत मेव्हण्याकडून आणली होती. प्रवीण काळे हा मुख्य संशयित असून त्याने सोमनाथ कोंडाळकर व अजून एकजण यांनी कट रचून बेंच खरेदीची ऑर्डर देण्याच्या बहाण्याने अपंग असल्याचे सांगून स्विफ्ट कारमध्ये बसवून अपहरण केले होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790