नाशिक: नदीत पोहोण्यासाठी गेलेल्या २० वर्षीय युवकाचा बुडून मृत्यु

नाशिक: नदीत पोहोण्यासाठी गेलेल्या २० वर्षीय युवकाचा बुडून मृत्यु

दारणा पंपींग येथील नदीत पोहोण्यासाठी गेलेल्या २० वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. ओंकार विजय वाटपाडे (२०, रा. जेलरोड) असे मयत युवकाचे नाव आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' वाहतूक मार्गांत आज (दि. १४) महत्वाचे बदल…

ओंकार हा गेल्या मंगळवारी (ता. ४) दारणा पंपिंग येथे नदीत पोहोण्यासाठी गेला असता, त्यास अंदाज न आल्याने त्याचा नदीच्या पाण्यात बुडाला.

🔎 हे वाचलं का?:  परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी 1 मे पासून मराठी भाषा आवश्यक- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

त्याचा मित्र राहुल विराळ याने त्यास उपचारासाठी देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून, हवालदार बागुल हे तपास करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790