नाशिक: दुचाकीला झालेल्या अपघातात दोन सख्खे भाऊ ठार
नाशिक (प्रतिनिधी): त्र्यंबकेश्वरच्या देशमुख वस्ती येथील सूरज खानझोडे हे दुचाकी एमएच १५ इवाय ५१८१ वरून त्यांचे दोन भाऊ दीपक खानझोडे (१८) आणि अजय खानझोडे (१७) हे तिघे ओझरकडून नाशिककडे येत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीचालक दीपक आणि मागे बसलेला अजय यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात मुंबई-आग्रारोड पीरमंदिर मनुदेवी मंदिर फलकाजवळ झाला. सूरज खानझोडे यांच्या तक्रारीवरून आडगाव पोलिस ठाण्यात अनोळखी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
महत्वाची बातमी: नाशिक शहरातील या मार्गांवर आता वाहनांना प्रवेश बंद !
Weather Alert: यंदाचा हिवाळा ठरणार हाडं गोठवणारा; हवामान खात्याचा इशारा
Aadhar Card: तुमच्या आधार कार्डसोबत किती नंबर आहेत लिंक; पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस