नाशिक जिल्ह्यातील खुली पर्यटन स्थळेही बंद

नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाची तिसरी लाट सुरु होण्याचे संकेत, सातत्याने वाढती रुग्णसंख्या आणि ओमीयक्राॅन व्हेरिएंटच्या प्रसाराचा वेग पाहता बंद जागेतील पर्यटन स्थळांपाठोपाठ आता खुल्या स्थानांची पर्यटनस्थळेदेखील बंद करा, असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले असून त्यावर तत्काळ अंमलबजावणी करण्याची ग्वाही जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि. १४) कोरोना आढावा बैठक पार पडली. त्यात रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक आक्रमक, लिलाव बंद पाडून कांदा निर्यात बंदीचा निषेध

शहरासह जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून कोरोना संसर्गितांची संख्या ही दोन हजारांच्या आसपास येत आहे.

गर्दी टाळण्यासाठी दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदी लागू आहे. पण गर्दी आटोक्यात येत नसल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यातही पर्यटन स्थळांवर प्रचंड गर्दी पहायला मिळत आहे. गडकिल्ले, धरण परिसर, उद्याने, निसर्गरम्य स्थळे या ठिकाणी पर्यटकांची तुफान गर्दी पहायला मिळते. त्यामुळे संसर्ग आणखी वेगाने पसरण्याची होण्याची भीती वाढली आहे. ते पाहता आता जिल्ह्यातील खुल्या जागेतील पर्यटनस्थळे बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: वीजजोडणीसाठी दीड हजाराची लाच घेणारा जेरबंद

हे ही वाचा:  बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय बालिका जखमी

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790