Amazon

नाशिक क्राईम: अनैतिक संबंधाच्या रागातून पत्नीच्या प्रियकरावर चाकूने वार…

नाशिक क्राईम: अनैतिक संबंधाच्या रागातून पत्नीच्या प्रियकरावर चाकूने वार…

नाशिक (प्रतिनिधी): पत्नीच्या प्रियकराला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे.

रविवारी (दि. ३ जुलै) रात्री हा प्रकार घडला.

पोलिसांनी सदर पत्नी, पती व पतीचा साथीदार यांना ताब्यात घेतले आहे.

पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या रागातून पतीने पत्नीच्या प्रियकराच्या गळ्यावर वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

🔎 हे वाचलं का?:  दिवाळी-भाऊबीजेसाठी रेल्वेचा दिलासा; भुसावळ-देवळालीदरम्यान दोन दिवस विशेष मेमू

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, टाकळीरोडवरील नारायणाबापूनगर परिसरात राहणार्‍या एका 30 वर्षीय इसमाचे एका विवाहित महिलेशी अनैतिक संबंध होते. ही बाब तिच्या पतीला समजल्याने त्याने काल (दि. ३ जुलै) रात्री आठ वाजेच्या सुमारास या प्रियकराच्या गळ्यावर वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. घटना घडल्यानंतर तो तेथून पसार झाला. स्थानिक नागरिकांनी त्या जखमी इसमास प्रथम सिव्हील हॉस्पिटल व त्यानंतर पुढील उपचाराकरता डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज येथे दाखल केले.

🔎 हे वाचलं का?:  दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर; फेब्रुवारीपासून लेखी परीक्षा

घटनास्थळी पोलिसांना आरजे 09एसएक्स 3992 या क्रमांकाची मोटारसायकल मिळून आली. त्यावरून माहिती घेतली असता जखमी इसमाचे शेजारी राहणार्‍या महिलेशी असलेल्या प्रेम संबंधांतून तिच्या नवर्‍याने आपल्या साथीदारासह आगळ टाकळी गाव येथील उसाच्या शेताजवळ त्याच्या गळ्यावर सुरा मारून त्यास गंभीर जखमी केल्याचे निष्पन्न झाले.

🔎 हे वाचलं का?:  मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आता तालुकास्तरावरही; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण निर्णय

पोलिसांनी त्वरीत संशयित आरोपीचा शोध घेत त्याला त्याच्या साथीदार व पत्नीसह ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. याप्रकरणी जखमी इसमाच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून भादंवि कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम उपनगर पोलीस ठाण्यात सुरू आहे. पोलिसांनी या जखमी इसमास खासगी रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790