नाशिक: केकचे पैसे मागितल्याचा राग; बेकरी चालकावर धारदार शस्त्राने वार

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिक: केकचे पैसे मागितल्याचा राग; बेकरी चालकावर धारदार शस्त्राने वार

नाशिक (प्रतिनिधी): केकचे पैसे मागितल्याचा राग आल्याने सहा जणांच्या टोळीने बेकरीचालकासह कामगारास धारदार शस्त्राने वार करून जखमी केल्याची घटना सातपूर येथे घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अनिकेत सुरेश जाधव यांची कार्बन नाका येथे अभिषेक बेकरी आहे. या बेकरीवर काल संशयित आरोपी शुभम् अरुण पवार (वय 21, रा. ध्रुवनगर, गंगापूर, नाशिक), हेमंत अरुण गाडेकर (वय 21, रा. शिवाजीनगर, सातपूर), मुकेश दिलीप कुंभार (वय 23, रा. श्रमिकनगर, सातपूर, मूळ रा. पाचोरा, जि. जळगाव), सागर सुरेश गायकवाड (वय 19, रा. शिवाजीनगर, सातपूर, मूळ रा. आराई, ता. बागलाण), नयन विठ्ठल गवई (वय 25, रा. श्रमिकनगर, सातपूर, मूळ रा. बुलढाणा) व पंकज ऊर्फ विकी कैलास श्रीसागर (वय 27, रा. सातपूर, मूळ रा. करंजवण, ता. दिंडोरी) हे सहा जण आले. फिर्यादी जाधव यांच्या दुकानातून केकची ऑर्डर देऊन केक घेऊन जात असताना बेकरीमालकांनी केकचे पैसे मागितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यात बर्ड फ्लू पार्श्वभूमीवर कुक्कुटपालकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

नाशिक: अंगावरची हळदही अजून फिटली नव्हती अन् विवाहाच्या चौथ्या दिवशी तिने घेतला अखेरचा श्वास

त्याचा राग आल्याने या सहा जणांनी दुकानमालकांना धाक दाखवून शिवीगाळ केली, तसेच दुकानातील कामगारांना धमकावले. त्यानंतर सहा जणांपैकी कोणी तरी धारदार हत्याराने दुकानमालकाच्या डोक्यात मारून दुखापत केली. त्यानंतर हे टोळके पळून गेले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तीन दिवसांत घरफोडीचा उलगडा; २३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, दोन आरोपी अटकेत

या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात सहा तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार आहेर करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790