नाशिकरोडला भरदिवसा घरफोडी; ३ लाख ९० हजारांचा ऐवज लंपास

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोड येथील तरणतलाव भागात असलेल्या जगताप मळा येथे भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे चार लाखाचा ऐवज लंपास केला.

या घरफोडीत रोकडसह सोन्याचांदीचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेले.

याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप चंदुमल दरयानी (रा.हरिसंकल्प अपा.जगतापमळा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात फ्लेमिंगो पाहुण्यांचे आगमन; गुलाबी लाटेने जलाशयाला चढली विलक्षण झळाळी !

दरयानी कुटुंबिय शनिवारी (दि.१७) दुपारच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली.

अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे लॅचलॉक तोडून ही चोरी केली. घरात शिरलेल्या चोरट्यानी बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिने असा सुमारे ३ लाख ९० हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक उंडे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790