Amazon

नाशिक: उभ्या कंटेनरला पेट्रोल टँकर धडकला; चालक ठार

नाशिक (प्रतिनिधी): महामार्गावरील नववा मैल भागात कंटेनर आणि पेट्रोल टँकर यांच्यात झालेल्या अपघातात टँकर चालक ठार झाला. भुपेश नागो मगर (२७ रा. झोडगे ता. मालेगाव) असे मृत पेट्रोल टँकर चालकाचे नाव आहे. भरधाव टँकर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर जाऊन आदळल्याने ही दुर्घटना घडली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मुंबईनाका वाहतूककोंडी फोडण्यासाठी एसटी बसच्या मार्गात बदल; दोन्ही प्रवेशद्वारांचा कायमस्वरूपी वापर

या अपघातात टँकरची चालक कॅबीन दबली गेल्याने मृत चालक अडकला गेला होता. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मगर शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास आपल्या पेट्रोल टँकरवर मालेगावकडून मुंबईच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला.

आडगाव शिवारातील ९ वा मैल भागात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटनेरवर भरधाव टँकर पाठीमागून आदळला. चालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढणार; सोमवारी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट

या अपघातात टँकरची चालक कॅबीन पुर्णपणे दबली गेल्याने चालक मगर त्यात अडकले होते. नागरीकांनी धाव घेत त्यांना कॅबीन बाहेर काढून साई श्री हॉस्पिल येथे दाखल करण्यात आले होते. दुस-या दिवशी आडगाव मेडिकल कॉलेज येथे उपचारार्थ हलविले असता शनिवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास उपनिरीक्षक अरूण पाटील करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790