नाशिक( प्रतिनिधी) : देशातील पहिला टायरबेस मेट्रो प्रकल्प नाशिकमध्ये राबिण्याची घोषणा नाशिकला दत्तक घेतलेले माजी मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. निवडणुकीच्या तोंडावर हि घोषणा करण्यात आली होती. मात्र निवडणुका होऊन सत्तापलट झाली त्यानंतर अद्याप टायरबेस प्रकल्पा संदर्भात कोणतीही चर्चा न झाल्याने केवळ निवडणुकीसाठीच आश्र्वासन होते की काय? असा प्रश्न सगळेच विचारताय.
हा प्रकल्प लवकरात लवकर मंजूर करावा यासाठी राज्य सरकारच्या वतीने केंद्र सरकारला पत्र पाठवून विनंती करण्यात आली. नाशिक शहरात सीएनजी आणि इलेक्ट्रिक बस अधिक प्रमाणात असाव्यात असा प्रस्ताव माजी मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिला होता. डिझेल बस कमी करून सीएनजी बस तोट्यात जाणार नाही अशी हमी त्यावेळचे आयुक्त तुकाराम मुढे यांनी दिली होती.