दुर्दैवी घटना: नाशिकमध्ये पाटात पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील मखमलाबाद परिसरात पागे वस्ती जवळ एका पाटात पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे.
निलेश मुळे (वय:१४), प्रमोद जाधव (वय: १३), आणि सिद्धू धोत्रे (वय: १५) अशी मृत्यू झालेल्या शाळकरी मुलांची नावं आहेत.
हि तीनही मुले नामको कॅन्सर हॉस्पिटल मागे असलेल्या गजवक्र नगरमधील रहिवासी आहेत.
पाटाला पाणी सोडलेले असल्याने दुपारी 2 वाजेच्या सुमारास पाच मित्र पोहोण्यासाठी आले होते. त्यापैकी तीन मित्र पाण्यात उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले. जीवरक्षक दलाच्या जवानांनी तिघांनाही वाचवण्याचा प्रयत्न केला. मुले बुडाल्याचे समजताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. तिघे बुडत असल्याचे पाहून इतरांनी आरडाओरडा केला. जीवरक्षकांनाही पाचारण करण्यात आले होते. मात्र अखेर या मुलांना वाचविण्यात अपयश आले. तिघांपैकी एक सीडीओ मेरी, एक रुंगठा तर एक जण मनपा शाळेत शिकत होता.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
धक्कादायक: नाशिकला या हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू…
नाशिक: “मेरी गाडी को कट क्यू मारा” असं म्हणत आधी मारहाण आणि मग लूट..