जिल्ह्यात आजपर्यंत १९ हजार ९५१ रुग्ण कोरोनामुक्त; ४ हजार ६३३ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १९  हजार ९५१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ४ हजार ६३३ रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये २०४ ने घट झाली आहे.  आत्तापर्यंत ७०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे वेळेत पूर्ण करावीत- अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण: नाशिक ग्रामीण मध्ये  नाशिक २५५, चांदवड ६८ , सिन्नर २३२, दिंडोरी ४२, निफाड २८५, देवळा ७५,  नांदगांव १०८, येवला २६, त्र्यंबकेश्वर १९, सुरगाणा १०, पेठ ०१, कळवण ०७,  बागलाण १००, इगतपुरी ४०, मालेगांव ग्रामीण १४४ असे एकूण  १४१२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २ हजार ८२३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ६०५  तर जिल्ह्याबाहेरील ०८ असे एकूण ४ हजार ६३३  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  २५  हजार २८८  रुग्ण आढळून आले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अमृत स्नानाच्या दिवशी खासगी वाहने शहराबाहेरच थांबणार; नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये ७२ ठिकाणी वाहनतळांचे नियोजन

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ७३.७४,  टक्के, नाशिक शहरात ८२.२७ टक्के, मालेगाव मध्ये  ६५.६७  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८४.६६  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७८.९० इतके आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे वेळेत पूर्ण करावीत- अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर

कोरोनामुळे झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण १८६, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ४००, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ९७ व जिल्हा बाहेरील २१ अशा एकूण ७०४ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790