नाशिक (प्रतिनिधी): गोविंदनगर येथील जॉगिंग ट्रॅकच्या तार कंपाऊंडची आणि ग्रीन जिमची दुरुस्ती करावी, अशी मागणी शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनने केली आहे. याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्त कैलास जाधव आणि सार्वजनिक बांधकामचे शहर अभियंता नितिन वंजारी यांना देण्यात आले आहे.
प्रभाग क्रमांक २४ मधील गोविंदनगर येथील स्वर्गीय शिवराम वझरे जॉगिंग ट्रॅकचे तार कंपाऊंड पूर्णपणे तुटले आहे. यामुळे येथे भटके कुत्रे, गायी, म्हशी यांचा शिरकाव होतो. चालण्यासाठी, व्यायामासाठी येणार्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो.
कंपाऊंड आणि नादुरुस्त ग्रीन जिम दुरुस्त करावी, गोविंदनगर, सदाशिवनगर, सद्गुरूनगर, बाजीरावनगर, कालिका पार्क, तिडकेनगर, कर्मयोगीनगर, जगतापनगर, उंटवाडी या भागातील नागरिक या ट्रॅकवर सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणात येतात. मोठ्या प्रमाणात झाडे असल्याने दिवसभर येथे वर्दळ असते. कंपाऊंड आणि ग्रीन जिमची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी शिवसैनिक, सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारूशिला गायकवाड (देशमुख), शिवसेना शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार, संजय टकले, श्याम अमृतकर, दिलीप दिवाने, श्रीकांत नाईक, विनोद पोळ, संजय बाविस्कर, राजेंद्र वडनेरे, राजेंद्र महाले, रवी मूल, राजेंद्र तायडे, सी. आर. पाटील, यशवंत जाधव, बाळासाहेब राऊतराय, मनोज वाणी, निलेश ठाकूर, मकरंद पुरेकर, सोपान थोरात, प्रसन्ना पाटील, कांतीलाल उबाळे, सुनील पाटील, सुनील वाजे, सुनिता उबाळे, उज्ज्वला सोनजे, वंदना पाटील, रितेश वाजपेयी, स्वप्नील सोनवणे, संतोष चकणे, अतुल पाटील, दीपक ढासे, मनोज कोळपकर, डॉ. शशिकांत मोरे, डॉ. राजाराम चोपडे, डॉ. सुनील चौधरी, बन्सीलाल पाटील, मनोज पाटील, मोहन पाटील, बाळासाहेब दिंडे, आशुतोष तिडके, नितिन तिडके, बाळासाहेब तिडके, पुरुषोत्तम शिरोडे, राहुल पाटील, हरिष काळे, संदीप महाजन, दीपक दुट्टे, शैलेश महाजन, बापू आहेर, अशोक पाटील, ज्ञानेश्वर महाले, दिलीप रौंदळ, सुरेश पाटील आदींसह रहिवाशांनी केली आहे.