अबब.. नाशिकमध्ये डेंग्यू चिकुनगुन्याच्या रुग्णांची संख्या इतकी वाढली..
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात डेंग्यू आणि चिकुनगुन्याने थैमान घातल्यानं रुग्णांची संख्या थेट १,३०० वर जाऊन पोहोचलीय. कोरोनानंतर आलेल्या या संसर्गामुळे नाशिककरांनी मात्र चांगलाच धसका घेतलाय. पालिका प्रशासन मात्र याबाबत फार गंभीर नसल्याचंच दिसतंय.
शहरातील डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ७००, तर चिकुनगुन्या रुग्णांची संख्या ५५० च्या घरात आहे. दोन्ही रुग्णांची संख्या जवळपास तेराशेदरम्यान आहे. कोरोना संसर्गाचा प्रभाव कमी होत असतानाच यंदा डेंग्यू आणि चिकुनगुन्याने नागरिक त्रस्त झालेत. सप्टेंबरच्या १४ तारखेपर्यंत डेंग्यूचे १४०, तर चिकुनगुन्याचे ९५ नवे रुग्ण आढळून आले. ऑगस्टमध्ये डेंग्यूचे ३११, चिकुनगुन्याचे २१० रुग्ण सापडले होते.शहरात गेल्या १५ दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्यानं अनेक सोसायट्या डासउत्पत्तीचं केंद्र बनलंय.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”8141,8164,8079″]
शहरातल्या खासगी आणि सरकारी रुग्णालयांमधील सर्दी, ताप, खोकला, अंगदुखीचे रुग्ण वाढलेत. अनेक खासगी हॉस्पिटल्स डेंग्यू, चिकुनगुन्याच्या रुग्णांनी फूल झाली आहेत. अनेक रुग्णालयांत तर रुग्णांसाठी जागाच नसल्याचं चित्र आहे. त्यातच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे. महापालिकेने तातडीने उपाययोजना करत डासनिर्मिती रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जातेय.