या बातमीच्या शेवटी एक Exclusive डिस्काऊंट कुपन..
नाशिक (प्रतिनिधी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईतून दोन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. या दोन्ही वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई-सोलापूर आणि मुंबई-साईनगर शिर्डी अशा धावणार आहेत.
या ट्रेनमुळे प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. परंतु वेळ जरी वाचणार असला तरी या ट्रेनसाठी इतर ट्रेनपेक्षा तिकीट दर जास्त असणार आहे. या दोन्ही गाड्या आठवड्यातून सहा दिवस धावतील.
सीएसटी ते शिर्डी असा मार्ग असलेल्या वंदे भारत ही एक्सप्रेस पाच तास 20 मिनिटात पार करणार आहे. तर नाशिकरोड हे अंतर अवघ्या दोन तास 37 मिनिटांत पार करणार आहे.
मात्र ही वंदे भारत एक्स्प्रेस इगतपुरीला न थांबता थेट नाशिकरोडला येणार आहे. शिवाय नाशिकरोडला (Nashikroad) केवळ दोनच मिनिटे थांबणार असल्याने प्रवाशांना उतरणे सोयीस्कर होणार नसल्याचे चित्र आहे. मुंबई ते शिर्डी हे 343 किलोमीटरचे अंतर असून सकाळी सव्वा सहा वाजता मुंबई सीएसटीवरुन सुटणारी गाडी शिर्डीला दुपारी साडेअकरा वाजता पोहोचणार आहे. तर तत्पूर्वी वंदे भारत एक्स्प्रेस नाशिकला सकाळी साडेआठच्या सुमारास पोहोचेल.
जाणून घेऊया वेळापत्रक आणि तिकीट दर.
मुंबई ते साईनगर शिर्डी वेळापत्रक:
मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी 6.20 वाजता सीएसएमटीहून सुटेल आणि साईनगर शिर्डी येथे 5 तास 20 मिनिटांनी सकाळी 11.10 वाजता पोहोचेल. सीएसएमटीहून सुटणारी ही गाडी दादर, ठाणे, नाशिक रोड स्थानकावर थांबेल. तर साईनगर शिर्डी-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस साईनगर शिर्डी येथून सायंकाळी 5.25 वाजता सुटेल आणि 5 तास 25 मिनिटांनी ती मुंबईत रात्री 10.50 वाजता पोहोचेल. मंगळवारी मुंबई आणि शिर्डी येथून ही गाडी नसेल.
काय असणार तिकीट दर?:
मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कोचसाठी अनुक्रमे 975 रुपये आणि 1840 रुपये मोजावे लागणार आहेत. या तिकिटामध्ये केटरिंगचा देखील समावेश आहे. प्रवाशांनी ऑन-बोर्ड केटरिंगची निवड न केल्यास चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कोचसीटसाठी अनुक्रमे 840 रुपये आणि 1670 रुपये तिकीट असेल.
साईनगर शिर्डी येथून साईनगर शिर्डी-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे भाडे अनुक्रमे 1130 रुपये आणि चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कोचसाठी 2020 रुपये असेल. यामध्ये केटरिंग शुल्काचाही समावेश आहे. कॅटरिंगशिवाय चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कोचचे भाडे अनुक्रमे 840 आणि 1670 रुपये असेल.
- नाशिक: भरधाव मालट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील महिला ठार
- नाशिक: मुंबई-आग्रा महामार्गावर कारचा अपघात; चार जण जखमी
- नाशिकमधील ‘या’ तीन खासगी शाळा बंद करण्याचा निर्णय: पालकांची फसवणूक
मुंबई ते सोलापूर वेळापत्रक:
सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सोलापूरहून सकाळी 6.05 वाजता सुटेल आणि साडे सहा तासांच्या प्रवासानंतर मुंबईत दुपारी 12.35 वाजता पोहोचेल. ही ट्रेन कुर्डूवाडी, पुणे, कल्याण आणि दादर स्थानक घेत सीएसएमटी स्थानकावर पोहचेल. तर मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस सायंकाळी 4.05 वाजता सीएसएमटीवरून सुटेल आणि 6 तास 35 मिनिटांच्या प्रवासानंतर सोलापूरला रात्री 10.40 वाजता पोहोचेल. यामध्ये बुधवारी मुंबईतून ही ट्रेन नसणार आणि सोलापुरातून गुरूवारी नसणार आहे.
मुंबई ते सोलापूरसाठी तिकीट:
मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह कोचसाठी अनुक्रमे 1300 रुपये आणि 2365 रुपये मोजावे लागणार आहेत. या भाड्यात केटरिंगचा समावेश आहे. तर केटरिंगची निवड न केल्यास चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कोचसाठी अनुक्रमे 1010 रुपये आणि 2015 रुपये तिकीट असेल.
सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे भाडे अनुक्रमे 1150 रुपये आणि चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कोचसाठी 2125 रुपये असेल. यामध्ये केटरिंग शुल्काचाही समावेश आहे. तर कॅटरिंगशिवाय चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठी अनुक्रमे 1010 रुपये आणि 2015 रुपये तिकीट असणार आहे.
नाशिक कॉलिंगच्या फोलोअर्ससाठी Exclusive Coupon. Download करा