दुर्दैवी: नाशिकला आठ वर्षाच्या बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोड येथे एका आठ वर्षाच्या बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना जाखोरी गावाजवळील चांदगिरी येथे घडली असून हा मुलगा घरासमोरच असलेल्या कडवा कालव्याजवळ पोहण्यासाठी गेला होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अन्न भेसळ, अस्वच्छतेबाबत नागरिक सजग; नाशिक विभागात ऑनलाइन पोर्टलवर १२४ तक्रारी

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक शिवाजी शेलार (वय ८) रा. शेलार गल्ली, चांदगिरी हा मुलगा घराजवळ असताना जवळच असलेल्या कडवा कालव्यामध्ये पोहण्यासाठी गेला होता. मात्र, पाणी जास्त असल्याने सदर बालकाला अंदाज न आल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून त्याच्या दुर्दैवी मृत्यू झाला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रत्येक महाविद्यालयात स्थापन होणार 'कुंभ कक्ष'; सिंहस्थ २०२७ साठी विद्यार्थी स्वयंसेवकांची नोंदणी सुरू

सदर घटना ही घटना नातेवाईक व आजूबाजूच्या नागरिकांना समजताच त्यांनी तातडीने त्याला बाहेर काढले व उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. या घटनेप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790