Amazon

नाशिक: एकाच कंपनीतील तिघांचा 2 दिवसांत हृदयविकाराने मृत्यू

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

नाशिक (प्रतिनिधी): सातपूर येथील एकाच कंपनीतील तीन कामगारांचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने दोन दिवसांत मृत्यू झाल्याने कंपनीतील कामगार व अधिकारी वर्गामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

कंपनीच्या पेंटशॉप विभागातील कामगार प्रकाश बाळासाहेब जाधव (वय ४५, रा. अमृतधाम, पंचवटी) यांचे ह्रदयविकाराने घरीच गुरुवारी (ता.१८) सकाळी निधन झाले.

🔎 हे वाचलं का?:  दिवाळी-भाऊबीजेसाठी रेल्वेचा दिलासा; भुसावळ-देवळालीदरम्यान दोन दिवस विशेष मेमू

ते मायको कंपनीतील निवृत्त कामगार बाळासाहेब जाधव यांचे पुत्र व महिंद्र अँड महिंद्र कंपनीतील कार्मिक व्यवस्थापन विभागातील कर्मचारी नीलेश जाधव यांचे बंधू होत.

तर शुक्रवारी (ता.१९) दुसऱ्या दिवशी बॉडीशॉप विभागातील कामगार भागचंद चिला खैरनार (वय ५७) यांचे निधन झाले. दवाखान्यात उपचार सुरू असताना त्यांना अचानक ह्रदयविकाराचा जोरदार झटका आल्याने त्यांचे निधन झाले.

🔎 हे वाचलं का?:  मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आता तालुकास्तरावरही; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण निर्णय

त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा आहे. खैरनार यांचा अंत्यविधी त्यांच्या मूळगावी पाटणे (ता. मालेगाव) येथे झाला.

तिसरे कामगार दीपक अनिल तळेले (वय ३५, रा. कामठवाडे) यांच्या छातीत अचानकपणे दुखू लागल्याने ते मित्रासोबत तातडीने त्रिमूर्ती चौकातील खासगी दवाखान्यामध्ये लिफ्टने जातानाच त्यांचाही ह्रदयविकाराचा जोरदार झटका आल्याने मृत्यू झाला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकरोडच्या अर्जुन पिवाल टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई

त्यांच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी व चौथीत शिकणारा मुलगा असा परिवार आहे. तळेले यांचा अंत्यविधी मोरवाडी येथील अमरधाममध्ये करण्यात आला. प्रसंगी कंपनीतील कामगारांनी मोठी गर्दी केली होती.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790