नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): अवघ्या ४८ तासात चोरीचा गुन्हा उकल करण्यात पंचवटी गुन्हे शोध पथकास यश मिळाले असून या संशयिताकडून जवळपास ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
संगम संजय मुळे( रा.उदगीर जि लातूर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि दिपक देविदास लड्ढा रा.त्रंबकेश्वर किराणा व्यावसायिक हे ३० सप्टेंबर रोजी डॉक्टरांना भेटण्यासाठी पेठ रोडवरील भक्ती संकुल या ठिकाणी गेले होते. त्यावेळी गाडीचालकासोबत किराणा दुकानाची रोख रक्कम घेऊन आले होते.
लड्ढा यांचे दोन लाख रुपये आणि चारचाकी वाहनांची चावी घेऊन संशयित संगम संजय मुळे पसार झाला. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पो.निरीक्षक रोहित केदार, पोना जयवंत लोणारे आदी गुन्हे शोध पथकाने चोरीचा कोणताही पुरावा सुगावा नव्हता.
हा गुन्हा उकल करण्यासाठी विविध पथके छत्रपती संभाजी नगर,त्रंबकेश्वर,कल्याण पाठविली होती. संशयित संगम संजय मुळे यास कल्याण शहरातून ताब्यात घेण्यात आले.
यांच्याकडून रोख रक्कम ५७ हजार व २५ हजार किमतीचे दोन मोबाईल आणि गाडीची चावी असा एकूण ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी अधिक तपास पोहवा माळोदे करीत आहे.
यांनी बजाविली कामगिरी:
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पंचवटी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त नितीन जाधव, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक रोहित केदार,मिथुन परदेशी, सहायक पोलिस उपनिरीक्षक अशोक काकड, वनवे, पोलिस हवालदार कुलकर्णी, गुंबाडे, पोलिस नाईक नांदुर्डीकर, शिंदे, भोईर, मालसाने, शिंदे, लोणारे, पोलिस अंमलदार पवार, जाधव, पवार, सावळे, महाले, पचलारे, परदेशी, कैलास कचरे यांनी केली आहे.