नाशिक (प्रतिनिधी): उत्तरेकडून भुसावळ, मनमाड, नाशिकमार्गे मुंबईकडे जाणाऱ्या चार प्रमुख प्रवासी रेल्वे गुरुवारी (दि. ३०) नाशिकरोड स्थानकातून चार ते पंधरा तासांपर्यंत विलंबाने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी झाल्याचे चित्र असले तरी उत्तर भारतात मात्र अजूनही थंडी आणि धुक्याचा प्रभाव कायम असल्याने या गाड्यांना विलंब झाला.
उत्तरेत चार दिवस अतिदाट धुके, रेल्वेंना विलंबाची चिन्हे : पुढील चार दिवस उत्तर भारतात विशेषतः दिल्ली व लखनऊ परिसरात अतिदाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे तिकडून मुंबईकडे धावणाऱ्या रेल्वेंना उशीर होण्याची दाट शक्यता आहे. प्रवाशांना रेल्वे संकेतस्थळ किंवा जवळच्या स्थानकावरुन अद्यावत माहिती घेता येईल.
.. या गाड्यांना उशीर:
वाराणसी-मुंबई महानगरी एक्स्प्रेस : ४ तास ५० मि.
कुर्ला अंत्योदय एक्स्प्रेस : १४ तास ५० मि.
पाटलीपुत्र-कुर्ला एक्स्प्रेस : ३ तास ५० मि.
गुवाहाटी-कुर्ला एक्स्प्रेस : ४ तास
हावडा-छपरा- २० मि.