“ही” रेल्वे आता आठवड्यातून एकदाच धावणार

नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हावडा-मुंबई या विशेष गाडीच्या फेऱ्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. ही गाडी यापूर्वी दररोज चालविण्यात येत होती. परंतु आता आठवड्यातून एक दिवस चालवण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय.

येत्या बुधवारपासून (दि.१५) हावडा-मुंबई अप म्हणजेच हावडा हून मुंबईला जाणारी गाडी ही फक्त बुधवारीच धावणार आहे. प्रत्येक बुधवारी हावडा येथून रात्री ८.०० वा. सुटून शुक्रवारी मुंबईला संध्याकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी पोहोचेल. त्याचप्रमाने १७ तारखेपासून डाऊन हावडा मेल म्हणजेच मुंबईहून हावडा ला जाणारी गाडी प्रत्येक शुक्रवारी मुंबईहून रात्री ८ वाजून ३५ मिनिटांनी सुटून रविवारी पहाटे हावडा येथे पोहोचेल.

Loading

हे ही वाचा:  नाशिक: लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; ९८ लाख रुपयांची फसवणूक

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group