Breaking: मनमाडमधील रेल्वे ओवरब्रिजचा भाग कोसळला, थोडक्यात टळली मोठी दुर्घटना

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मनमाड पुणे -इंदौर महामार्गांवर असलेला मनमाड शहरातील रेल्वे ओवरब्रिज चा एक भाग कोसळला. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मनमाड शहराच्या दोन भागांना जोडणारा हा पुल आहे. सकाळी सहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असून सध्या पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. दरम्यान येवल्याकडून मनमाडकडे येणारी वाहतूक बंद करण्यात आली असून मालेगावकडे जाणारी वाहतूक आता येवला-नांदगाव मार्गे वळविण्यात आली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

मनमाड शहरातील रेल्वे ओवरब्रिजचा एक भाग कोसळल्यानं या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सुदैवानं ब्रिज कोसळताना रेल्वेरुळावर कोसळला नाही. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. हा ब्रिज जुनाट झालेला असून अनेक वेळा याविषयी तक्रारी करण्यात आल्या आहेत.

मनमाड शहरातून जाणारा पुणे -इंदौर महामार्गांवरील रेल्वे ओवरब्रिजचा एक भाग कोसळल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडल्यामुळे या महामार्गवरील वाहतूक ठप्प झाली आहे. या उड्डाणपुलाच्या खालून रेल्वे तर वरून वाहनं जातात. त्यामुळे वाहतुकीसाठी हा ब्रिज महत्वाचा मानला जातो. सुदैवाने ब्रिज भाग रेल्वे रुळावर कोसळला नाही.त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

हा ब्रिज जुनाट आणि कमकुवत झालेला असून या अगोदर एक वर्षापूर्वी देखील अशीच घटना घडली होती मात्र तरी देखील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वे प्रशासनातर्फे पाहिजे तेवढी दक्षता घेण्यात आली नाही त्यामुळे आजची घटना घडली आहे.

दरम्यान, ब्रिजचा एक भाग कोसळल्यानंतरचे दृश्यही समोर आले आहेत. या व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. ब्रिजच्या एक भाग कोसळल्यानं या ठिकाणाहून जाणाऱ्या वाहनांची एकच गर्दी झाली असून नागरिकांना वाहतुक कोंडीला सामोरं जावं लागतंय.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790