नाशिक (प्रतिनिधी): अपघाताच्या गुन्ह्यात अटक न करता कोर्टात हजर करण्यासाठी २५ हजारांची लाचेची मागणी करत तडजोडीअंती १३ हजाराची लाच स्वीकारताना सातपूर पोलिस ठाण्याचे हिरामण गणपत सोनवणे, राहुल पोपट गायकवाड आणि सारंग एकनाथ वाघ या तीन कर्मचाऱ्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. अशोकनगर परिसरातील बोलकर चौकीत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि. १६) सायंकाळी ही कारवाई केली.
हे ही वाचा: नाशिक: घरफोडी करणारी सराईतांची टोळी जेरबंद; २५ तोळे सोन्यासह १७ लाखांचा मुद्देमाल जप्त !
याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, सातपूर पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल असून यातील संशयिताला अटक न करण्यासाठी २५ हजाराची मागणी केली. एसीबीकडे दिलेल्या तक्रारीनुसार सापळा रचून तिघांना १३ हजारांची लाच घेताना अटक करण्यात अाली. यातील वाघला यापूर्वीही लाच घेताना अटक झालेली आहे.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790