नाशिक: पोलीस आयुक्त ‘ऍक्शन मोड’मध्ये! शहरभर कोंबिंग ऑपरेशन; टवाळखोरांची धरपकड

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): अवघ्या चार दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त पद स्वीकारलेले नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक अखेर ॲक्शन मोडवर आले आहेत.

शहरात सलग दोन दिवस दोन खून झाल्यानंतर पोलीस आयुक्तांनी आज मंगळवारी (ता 28) रात्री अचानक कोंबिंग ऑपरेशन राबवत टवाळखोरांसह रेकॉर्डवरील गुन्हेगारांची धरपकड केली यामुळे शहरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणल आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: सातपूर गोळीबारातील फरार शुभम निकम अखेर गजाआड

नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गेल्या शुक्रवारी आयुक्तपदी रुजू झाले. आयुक्त रुजू होऊन दोन दिवस होत नाही तोच रविवारी रात्री अंबड हद्दीमध्ये अल्पवयीन मुलाचा खून करण्यात आला तर सोमवारी संध्याकाळी म्हसरूळ हद्दीमध्ये सेवानिवृत्त सैनिकाचा खून करण्यात आल्याची घटना घडली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: रस्त्यात अडवून जबरी लूट करणाऱ्या दोघांना अटक !

खुनाच्या दोन घटना एकापाठोपाठ घडल्याने नवीन पोलीस आयुक्त कर्णिक यांच्यासमोर एक प्रकारे गुन्हेगारांचे उभे ठाकले.

त्यामुळे आयुक्त कर्णिक यांनी मंगळवारी दुपारी पोलीस उपायुक्तांसह पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत गुन्हेगारी विरोधात धडक कारवाईचे आदेश देत, रात्री 7 ते 11 वाजेपर्यंत कोंबिंग ऑपरेशन राबविले.

पोलीस ताफा रस्त्यावर:
चार पोलीस उपायुक्त, सात सहायक आयुक्त, 30 पोलीस निरीक्षक, 125 सहायक निरीक्षक-उपनिरीक्षक यांच्यासह 1150 पोलीस अंमलदार आजच्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये सहभागी झाले होते.

⚡ हे ही वाचा:  पोलिसांच्या समर्थनार्थ लावलेली होर्डिंग्ज काढावीत – नाशिक शहर पोलिसांचे नागरिकांना आवाहन

13 पोलीस ठाण्याअंतर्गत रेकॉर्ड वरील गुन्हेगारांसह टवाळखोरांना लक्ष्य करण्यात आले. यावेळी टवाळखोरांना ताब्यात घेत त्यांची फोटोसह नोंदी घेण्यात आल्या. पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारांसह टवाळखोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here