👉 कॅनडा कॉर्नर येथे ऑफिस स्पेस भाड्याने देणे आहे. अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा..

नाशिक (प्रतिनिधी): गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र येथून नाशिकरोडमधील जलकुंभ भरणाऱ्या मुख्य ऊर्ध्ववाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे.
त्यामुळे दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावयाचे आहे.
असे असल्या कारणाने बुधवारी (दि. २२ डिसेंबर) नाशिकरोडला काही भागात दुपारी व सायंकाळी पाणीपुरवठा बंद राहील.
तसेच गुरुवारी (दि. २३ डिसेंबर) सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे
या भागांत पाणीपुरवठा नाही:
प्रभाग क्र. १७ : कॅनोल रोड परिसर, नारायण बापूनगर, चंपानगरी, गोदावरी सोसा., दसकगाव, शिवाजीनगर, एमएससीबी कॉलनी, तिरुपतीनगर, टाकळीरोड परिसर. प्रभाग क्र. १८ : शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, अयोध्या कॉलनी, पवारवाडी, इंगळे चौक, पंचक गांव सायखेडारोड, भगवा चौक, शिवशक्तीनगर. प्रभाग क्र. १९ : गोरेवाडी. प्रभाग क्र. २० : पुणे रोड परीसर, डावखरवाडी, जयभवानी रोड परिसर, अश्विनी कॉलनी, जेतवननगर, बिटको कॉलेज तरणतलाव. प्रभाग क्र.२१ : जयभवानी रोड परिसर, सहाणे मळा, लवटेनगर १ व २, आर्टीलरी सेंटर रोड, दत्तमंदिर रोड, धोंगडेनगर, जगताप मळा, तरणतलाव परिसर, चव्हाण मळा, फर्नांडिस वाडी, भालेराव मळा, जाचकनगर, नंदनवन कॉलनी, आवटेनगर. आणि प्रभाग क्र. २२ : रोकडोबावाडी, डोबी मळा, सुंदरनगर या भागात पाणीपुरवठा बंद राहील.