नाशिक जिल्ह्यातील रुग्णालयांना मिळाल्या इतक्या नवीन रुग्णवाहिका…

नाशिक (प्रतिनिधी): येवला उपजिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील इतर सात रुग्णालयाना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून नाशिक जिल्ह्यासाठी आठ रुग्णवाहिका राज्य शासनाकडून प्राप्त झाल्या आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध रुग्णालयातील रुग्णवाहिकेचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

कोरोनाच्या काळात नाशिक जिल्ह्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये रुग्णवाहिकांची नितांत आवश्यकता होती. त्यादृष्टीने पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नवीन रुग्णवाहिका मिळाव्यात त्यादृष्टीने आरोग्य विभागाकडे पाठपुरावा केला. त्यातून जिल्ह्यातील आठ रुग्णालयांना रुग्णवाहिका मंजूर करण्यात आल्या असून त्या प्राप्त देखील झालेल्या आहे.

हे ही वाचा:  नाशिक: भरधाव कार पलटी होऊन दोघांचा मृत्यू; समृध्दी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच

प्राप्त झालेल्या एकूण रुग्णालयात येवला उपजिल्हा रुग्णालय, कळवण उपजिल्हा रुग्णालय, निफाड उपजिल्हा रुग्णालय, चांदवड उपजिल्हा रुग्णालय, मनमाड उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय दिंडोरी, मालेगाव सामान्य रुग्णालय व मालेगाव महिला रुग्णालय या रुग्णालयांचा समावेश आहे. या सर्व रुग्णालयांना प्रत्येकी एक अशा एकूण आठ रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत.त्यामुळे या रुग्णालयातील रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे.

हे ही वाचा:  नाशिक: आईचंच काळीज ते! लेकराचा मृत्यू झाल्याचं कळलं, आईनेही प्राण सोडला

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790