नाशिकच्या कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट: शहर: ९४.३२ टक्के तर ग्रामीण: ९२.१८ टक्के

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख  ४२ हजार १०८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत २० हजार ४८७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये २०६ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ४ हजार ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १ हजार ७८४,  बागलाण ५८८, चांदवड ६६२, देवळा ६०५, दिंडोरी ८२४, इगतपुरी १९९, कळवण  ५२८, मालेगाव ३६१, नांदगाव ३२७, निफाड १ हजार ४१, पेठ ८६, सिन्नर ९८०, सुरगाणा २६९, त्र्यंबकेश्वर १७२, येवला १४९ असे एकूण ८ हजार ५७५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १० हजार ४९०, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ३२२  तर जिल्ह्याबाहेरील १०० असे एकूण २० हजार ४८७  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  ३ लाख ६६ हजार ६३५ रुग्ण आढळून आले आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: पोलीस अंमलदाराला चाकूने भोसकले; जखमी अवस्थेतही आरोपीला पकडले !

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९२.१८  टक्के, नाशिक शहरात ९४.३२ टक्के, मालेगाव मध्ये  ८६.६७  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९६.०८ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९३.३१ इतके आहे.

हे ही वाचा:  नाशिक: शेअर्स ट्रेडिंगमध्ये जादा नफ्याचे आमिष, १७ लाखांचा गंडा

कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण १ हजार ९३७ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  १ हजार ७२२  मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २८२  व जिल्हा बाहेरील ९९ अशा एकूण ४ हजार ४० रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: ५ अल्पवयीन मुलांनी मैत्रिणींसोबत फिरण्यासाठी चोरल्या ११ दुचाकी

(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून दि. १५ मे सकाळी ११ वाजता प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790