नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरातील दत्त मंदिर सिग्नलवर मंगळवारी (दि. २२ जून) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एका ट्रक आणि दुचाकीचा भिषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वार विनायक गणपत नागरे (वय: 48, राहणार चाडेगाव कोटमगाव नाशिक) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
सिन्नर फाट्याकडुन द्वारकेकडे जाणाऱ्या ट्रकने (क्रमांक जी जे 19 एक्स 1899) दत्त मंदिरकडे जाणार्या स्प्लेंडर गाडीला (क्र एम एच 15 बी 0952) धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. अपघातस्थळी उपनगर पोलिस ठाणे अंकीत बिटको पोलिस चौकिचे सहायक पोलिस निरीक्षक मन्नवर सिंग परदेशी त्यांचे सहकारी भोर आणि नाशिक रोड वाहतुक शाखेचे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांनी तातडीने मृ’तदेह रुग्णालयात रवाना करत वाहतुक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले .दरम्यान या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या अपघातानंतर बघ्यांची दत्त मंदिर सिग्नलवर गर्दी झाली होती