😊 लसीकरणामध्ये नाशिकरोडचे सेन्ट्रल जेल अव्वल !

नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाच्या काळात राज्यात नाशिकरोड कारागृह लसीकरणाच्या बाबतीत अव्वल ठरले आहे. विशेष म्हणजे कारागृहात अध्याप पर्यंत कोरोनाचा शिरकाव देखील झालेला नाही.

सगळीकडे कोरोनाचा कहर एवढ्या दीड वर्षात पाहायला मिळाला, अनेक नागरिकांना या कोरोनाच्या आजारामुळे आपला जीव गमवावा लागलाय.. यातच मुंबई, पुणे, धुळे, जळगाव येथील कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाला,परंतु विशेष बाब म्हणजे नाशिक मध्यवर्ती कारागृहात एकही कैद्याला कोरोनाची लागण झालेली नसल्याची माहिती आहे. कारागृह प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या योग्य खबरदारी आणि कडक उपाययोजना यांमुळे येथील कारागृहात कोरोनाला शिरकाव करता आलेला नाही..

हे ही वाचा:  नाशिक: मायको सर्कल, शरणपूररोडला गळतीमुळे कमी दाबाने पाणी

गेल्या 15 दिवसांत जवळजवळ 1400 कैद्यांच लसीकरण पूर्ण करून नाशिक कारागृहाने राज्यात अव्वल क्रमांक मिळवला आहे. मुंबई, पुणे, ठाणे आदी कारागृहांमध्ये कैद्यांना लसीकरण देण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे,त्यातच नाशिकरोड कारागृहात सर्वात जास्त लसीकरण करण्यात आले आहे. अडीच हजार बंदी आणि चारशे कर्मचारी या ठिकाणी असून यातील सर्व 80 महिला बंदी यांच लसीकरण पूर्ण करण्यात आले आहेत,तर 400 पैकी 300 कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहेत.तर येत्या दीड महिन्यात सर्वांचे लसीकरण पूर्ण होणार असल्याची माहिती कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली आहे.

हे ही वाचा:  Breaking: अंबड पोलीस ठाण्यात डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790