वडीलांनी केली तिथेच मुलानेही केली आत्महत्या

नाशिक (प्रतिनिधी): सिडकोतील २५ वर्षीय युवकाने रामवाडी पूलावरून गोदापात्रात उडी घेत जीवन संपवले. वडिलांनी ज्या ठिकाणी आत्महत्या केली तेच ठिकाण तीच पद्धत निवडत युवकाने स्वतःच्या जीवनाची अखेर केली. या घटनेने मानवी जीवनातील ताण-तणाव, कमकुवतपणा अधोरेखीत झाला आहे. 

सिडकोतील भगवती चौक येथे वास्तव्यास असलेल्या २५ वर्षीय पंकज नामक युवकाने शनिवारी सकाळी सव्वा अकरा वाजता दीपक नावाच्या मित्रास मोबाईलवर संपर्क साधला. ‘मी रामवाडी पूलावर आहे. वडीलांनी ज्या ठिकाणी आत्महत्या केली. त्याच ठिकाणी आत्महत्या करत असल्याचे सांगितले.’ हे ऐकून हादरलेल्या दीपकने पंकजला समजावण्याचा प्रयत्न केला. ‘तुला काही अडचण असेल तर मला सांग, परंतू आत्महत्येचा विचार मनात आणू नकोस’, असे दीपक सांगत असतानाच पंकजने मोबाईल बंद केला. त्यामुळे पंकजने तत्काळ रामवाडी पूलाकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. 

हे ही वाचा:  नाशिककरांना पाणीकपातीतून दिलासा; जलसंपदा विभाग आरक्षण वाढविणार

दीपक रामवाडी पूलावर पोहचला असता, तिथे त्यास गर्दी झालेली दिसली. या गर्दीत जाऊन पहाणी केली असता तिथे पंकज मृतावस्थेत आढळून आला. पंकजने गोदापात्रात उडी घेत आत्महत्या केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी दीपक यास सांगितले. पंकजच्या वडिलांनी तसेच पंकजने आत्महत्या का केली याचा उलगडा झालेला नाही. या घटनेने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790